पीककर्ज : उद्दिष्ट हजार कोटींचे, वाटप ३०० कोटींचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:21+5:302021-07-23T04:19:21+5:30

नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पीककर्ज आढावा बैठक घेतली. त्यात जालना जिल्हा जिल्ह्यातील पीककर्ज वाटपात बराच मागे असल्याचे ...

Peak loan: Target of Rs.1000 crore, allocation of Rs.300 crore | पीककर्ज : उद्दिष्ट हजार कोटींचे, वाटप ३०० कोटींचे

पीककर्ज : उद्दिष्ट हजार कोटींचे, वाटप ३०० कोटींचे

Next

नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पीककर्ज आढावा बैठक घेतली. त्यात जालना जिल्हा जिल्ह्यातील पीककर्ज वाटपात बराच मागे असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीर असून, बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट ३१ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. असे असताना बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना केवळ ३१५ काेटींचेच वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. या आढावा बैठकीत जिल्हा सहकार निबंधक नानासाहेब चव्हाण, अग्रणी बँकेचे मोघे यांच्यासह अन्य बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

चौकट

मध्यवर्ती बँक आघाडीवर

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या मध्यवर्ती बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी जवळपास १०६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. या बँकेस ११२ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. अत्यंत कमी मनुष्यबळात ही आणि अडचणीतून मार्ग काढत बँकेचे चेअरमन मनोज मरकड, तसेच व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या सूचनेनुसार पीककर्ज वाटपाला प्राधान्य देण्याचे सभेत सांगितले होते. त्याची पूर्तता येथे होताना दिसत आहे.

चौकट

या बँकांना दिल्या नोटीस

Web Title: Peak loan: Target of Rs.1000 crore, allocation of Rs.300 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.