कीटकनाशक दक्षता; जनजागृतीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:57 AM2019-09-25T00:57:40+5:302019-09-25T00:58:26+5:30

कपाशीसह इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Pesticide efficiency; Special campaign for the public awareness | कीटकनाशक दक्षता; जनजागृतीसाठी विशेष मोहीम

कीटकनाशक दक्षता; जनजागृतीसाठी विशेष मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कीटकनाशकांची फवारणी करताना ४४ शेतकरी बाधित झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कीटक नाशक कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. कपाशीसह इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आस्मानी-सुलतानी संकटात सापडलेला जालना जिल्ह्यातील शेतकरी पिकांवर पडलेल्या रोगराईला घालविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. मात्र, ही फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना कीटकनाशकांची बाधा होत आहे. चालू महिन्यातील २० दिवसात तब्बल ४४ शेतकºयांना कीटकनाशकांची बाधा झाली होती. यातील ३८ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर प्रकृती चिंताजनक असलेल्या ६ जणांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला रेफर करण्यात आले होते.
याबाबत ‘लोकमत’ने ‘४४ शेतक-यांना कीटकनाशकाची बाधा’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिध्द केले होते.
या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने मंगळवारी अधिकारी, कर्मचाºयांसह कीटकनाशक कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत पुढील १५ दिवस विशेष मोहीम हाती घेऊन कीटकनाशक फवारणी करताना शेतक-यांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत गावा-गावात जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी बी. एस. रणदिवे, गुणनियंत्रक एस. डी. गरांडे, जिल्हा मोहीम अधिकारी कराडे यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त पथक देणार माहिती
कृषीने नियुक्त केलेल्या पथकात कृषीचे अधिकारी, कर्मचारी आणि कंपनीचे प्रतिनिधी राहणार आहेत. तर समन्वयक म्हणून कृषी अधिकारी हे काम पाहणार आहेत, अशीही माहिती यावेळी आयोजित बैठकीत देण्यात आली.

शेतक-यांनी दक्षता घ्यावी
कीटकनाशकांची फवारणी करताना शेतक-यांनी संपूर्ण शरीर झाकावे, फवारणी यंत्र गळके असल्यास त्याचा वापर करू नये, उरलेले द्रावण जमिनीत खड्डा करून गाडावे.
व्यक्ती, पशुधन यापासून दूर ठेवावे, प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी यासह इतर आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी विकास अधिकारी बी.एस.रणदिवे यांनी केले आहे.

Web Title: Pesticide efficiency; Special campaign for the public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.