जलवाहिनी फुटली, पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:53 AM2018-03-14T00:53:46+5:302018-03-14T00:53:49+5:30
नगरपालिकेच्या जुना जालन्यातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल परिसराती रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. संथ गतीने सुरू असलेल्या या रस्त्याचे खोदकाम करताना मंगळवारी सरस्वती भुवन शाळेलगत जलवाहनी सहा ठिकाणी फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.
जालना : नगरपालिकेच्या जुना जालन्यातील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल परिसराती रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. संथ गतीने सुरू असलेल्या या रस्त्याचे खोदकाम करताना मंगळवारी सरस्वती भुवन शाळेलगत जलवाहनी सहा ठिकाणी फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.
जुना जालन्यातील इनकॅम टॅक्स कॉलनी परिसरात रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर खडी अंथरण्यात आली आहे. खडीमुळे दुचाकी अडखळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी दुपारी रस्त्याचे काम सुरू असताना, सरस्वती भुवन शाळेलगत जलवाहिनी फुटली. दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाचे पथक आलेच नाही. त्यामुळे शेकडो लीटर पाणी वाया गेले. रस्त्यावर सर्वत्र पाणीच-पाणी झाल्यामुळे शाळकरी मुलांची गैरसोय झाली. अनेक भागात अशाच पद्धतीने पाणी वाया जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.