गारगोटी दगडाची चोरटी वाहतूक; दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:57 AM2018-05-31T00:57:53+5:302018-05-31T00:57:53+5:30
मौल्यवान गारगोटीच्या दगडाचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना विशेष कृती दलाने ताब्यात घेतले आहे. भोकरदन -सिल्लोड मार्गावर ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : मौल्यवान गारगोटीच्या दगडाचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना विशेष कृती दलाने ताब्यात घेतले आहे. भोकरदन -सिल्लोड मार्गावर ही कारवाई करण्यात आली. संशयितांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भोकरदन-सिल्लोड मार्गाने मंगळवारी रात्री एका जीपमध्ये (क्र.एमएच २१ एक्स ६९५२) काही जण पांढºया, हिरव्या रंगाचे गारगोटी घेऊन जाणार असल्याची विशेष कृती दलास मिळाली होती. पोलिसांनी या रस्त्यावर सापळा लावून संशयित गाडीची तपासणी केली. त्यामध्ये १० हजार रूपये किमतीचे गारगोटी दगड आढळून आले. या प्रकरणी संशयित संतोष शिवाजी जाधव (रा.दहातांडा, ता.मंठा) व राजू सवईराम राठोड (रा. सेवलीतांडा) यांच्याविरुद्ध भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.