पिस्तूल पुरविणाऱ्या वकिलास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:07 AM2019-12-13T01:07:29+5:302019-12-13T01:07:42+5:30
विविध तीन गुन्ह्यांमध्ये पिस्तुले पुरविणारा आणि पेशाने वकील असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध तीन गुन्ह्यांमध्ये पिस्तुले पुरविणारा आणि पेशाने वकील असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालना शहरासह परिसरात पिस्तुलाचा वापर करून खून, जीवघेणे हल्ले, धमकी दिल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, पोलिसांनी पिस्तूल विक्रेत्याचा पर्दाफाश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परतूर येथील कुंदन खंडेलवाल खून प्रकरण, शेलगाव येथील खून प्रकरणात व सिंघवी यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना वकिली व्यवसाय करणा-या सुनील प्रेमदास वनारसे याचे नाव पोलिसांच्या समोर आले होते. पोलिसांनी पिस्तूल विक्री करणाºया वनारसे याला बदनापूर, परतूर पोलिसांत दाखल गुन्ह्यात अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सिंघवी यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणात वनरसे याला बुधवारी न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले.
सुनील वनारसे याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वनारसे याने पिस्तुले कोठून विकत घेतली आणि आणखी कोणा कोणाला विकली, यासह इतर बाबींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.