पिस्तूल, तलवार बाळगणाऱ्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:29 AM2019-06-05T01:29:18+5:302019-06-05T01:29:26+5:30
अवैधरित्या गावठी पिस्तूल व तलवार बाळगणाºया इसमास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागातून कारसह ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैधरित्या गावठी पिस्तूल व तलवार बाळगणाºया इसमास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागातून कारसह ताब्यात घेतले. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (३७, रा.कन्हैयानगर जालना), असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या आदेशानुसार जालना शहर व परिसरात सोमवारी रात्री कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना चंदनझिरा भागात एक इसम कारमधून अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरुन पथकाने चंदनझिरा भागात पहाटे २ वाजेच्या सुमारास सापळा रचला. अवैध शस्त्रे घेऊन येणारी कार येताच पोलीस निरीक्षक गौर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवर झडप घालून कारवाई केली. कार (एमएच-०१, एव्ही-०९०३) ची झाडाझडती घेतली असता, एक गावठी पिस्तुल आणि एक धारदार तलवार आढळून आली. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (रा.कन्हैया नगर जालना) यास ताब्यात घेऊन कारसह एक गावठी पिस्तुल व तलवार, असा ३ लाख ११ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, पोउपनि. जयसिंह परदेशी, पोलीस नाईक गोकुळ कायटे, विनोद गडदे, फुलचंदे हजारे, लखनसिंह पचलोरे, परमेश्वर धुमाळ, राहुल काकरवाल, रवी जाधव, सोमनाथ उबाळे, महिला पोलीस कर्मचारी शमशाद पठाण व चालक गणेश जाधव, धम्मपाल सुरडकर यांनी केली आहे.