नियोजन कोलमडले, रामदेव बाबांनी सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:42 AM2018-02-25T00:42:26+5:302018-02-25T00:43:41+5:30
शहरातील कलश सीडस्च्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण शिबिराचे नियोजन पहिल्याच दिवशी कोलमडल्याचे दिसून आले. ध्वनीक्षेपकासह एलईडी व आसन व्यवस्था करण्यात आयोजक कमी पडल्याने बाबा रामदेव यांनी आयोजकांना सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील कलश सीडस्च्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण शिबिराचे नियोजन पहिल्याच दिवशी कोलमडल्याचे दिसून आले. ध्वनीक्षेपकासह एलईडी व आसन व्यवस्था करण्यात आयोजक कमी पडल्याने बाबा रामदेव यांनी आयोजकांना सुनावले.
खा. रावसाहेब पाटील दानवे आयोजन समितीच्या वतीने शहरात योगगुरु बाबा रामदेव यांचे योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तयारी दोन महिन्यांपासून तयारी सुरु आहे. पहिल्याच दिवशी मैदानावर ध्वनीक्षेपकाचा आवाज मागच्या शिबिरार्थींपर्यंत पोहचला नाही. ही व्यवस्था पाहून बाबा रामदेव यांनी आयोजन समितीच्या पदाधिका-यांना खडे बोल सुनावले.
आयोजन समितीच सेल्फीत गुंग
योग शिबीर हे शारीरिक व मानसिक शांतीसाठी असते. मात्र, शिबीर सुरु असतानाच आयोजन समितीचे अनेक सदस्य मोबाईलवरुन राजकीय नेत्यांचे छायाचित्र आणि व्हीडीओ चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. या प्रकारामुळे इतरांना मानसिक त्रास सहन करावा लागला.