कृषी विभागाकडून फळझाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:12 AM2018-07-16T01:12:35+5:302018-07-16T01:13:43+5:30
राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत कृषी विभागाला पाच लाख ४३ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या अंतर्गत चिकू, मोसंबी तसेच डाळिंबाच्या झाडांची लागवड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
या अंतर्गत बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण, नजीकपांगरी, चितोडा, उज्जैनपुरी या गावामधील तरूणांनी देखील या वृक्षलागडवीस चांगला प्रतिसाद दिला आहे.
केळीगव्हाण परिसरातील अंकुश कदम, बाबूराव लहाने, संभाजी कान्हेरे, राजू लहाने, सखाराम लहाने, मिसार शहा, कदीर शहा, रेहमान शेख, बाळू सोरमारे आदींचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्याला शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जवळपास ३८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, याची प्रभावी अंमलबजावणी करण्यायसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे मार्गदर्शन निवृत्त वनअधिकारी तथा या मोहिमेतील सक्रिय कार्यकर्ते एकनाथ कान्हेनेरे यांनी दिली. त्यांनी रविवारी वरील गावाचा दौरा करून वृक्ष लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले.
कृषी विभागाला जे उद्दिष्ट दिले आहे, त्यापैकी या फळबाग लागवडीमुळे त्याला गती आली असून, आता पर्यंत ८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती एकनाथ कान्हेरे यांनी दिली.
पावसामुळे गती वाढली
जालना जिल्ह्यात विविध विभागांनी मिळून ३७ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याची तयारी उन्हाळ्यात विविध गाव तसेच रस्त्यालगत खड्डे खोदून केली होती. मात्र, मध्यंतरी पाऊस लांबल्याने ही मोहीम थंडावली होती. आता चांगला पाऊस होत असल्याने झाडे लावण्यासह त्यांची वाढ होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.