'पत्ता विचारत पिस्तुल काढले'; जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 06:02 PM2022-04-22T18:02:11+5:302022-04-22T18:20:10+5:30

दुपारी दीड वाजेच्या सुमारास २५ ते ३० वर्षीय युवक दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला.

'pointing gun asking for address'; Employees at the petrol pump were robbed threatening to kill | 'पत्ता विचारत पिस्तुल काढले'; जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लुटले

'पत्ता विचारत पिस्तुल काढले'; जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लुटले

Next

सेलगाव ( जालना ) : चंदनझिरा कितना दूर है, असे विचारून पेट्रोलंपपावरील दोन कर्मचाऱ्यांना पिस्तुल धाक दाखवून ८० हजार रुपयांना लुटल्याची घटना जालना-औरंगाबाद रोडवरील बदनापूर तालुक्यातील दावलवाडीजवळील सारथी पेट्रोलपंपावर शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जालना ते औरंगाबाद महामार्गावरील दावलवाडीजवळ सारथी पेट्रोलंपप आहे. या पंपावर शुक्रवारी दुपारी दोन कर्मचारी येणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरत होते. तर इतर कर्मचारी कार्यालयात बसले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास २५ ते ३० वर्षीय युवक दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला. त्यावेळी त्याने चंदनझिरा कितना दूर है अशी विचारणा कर्मचाऱ्यांकडे केली. नंतर माझ्या पायाला काहीतरी चावले आहे असे म्हणून खाली वाकून बंदूक काढली.

कर्मचारी इरफान शेख व अन्य एका कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून ८० हजार रुपये लंपास केले. कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: 'pointing gun asking for address'; Employees at the petrol pump were robbed threatening to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.