वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:21 PM2021-10-09T19:21:17+5:302021-10-09T19:21:51+5:30

उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो.

Poisoning of 30 people from Bhagari in Wadigodri area | वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

googlenewsNext

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील सहा नागरिकांना भगरीतून विषबाधा ( food poisoning) झाल्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावातील ३० जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने लोक उपवास धरतात. उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो. दोन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे भगरीतून सातजणांना विषबाधा झाली. त्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावांतही भगर खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मळमळ, उलट्या, अंगाचा थरकाप होणे, आदी त्रास या रुग्णांना होत आहे. यात वडीगोद्री येथील ज्ञानेश्वर भवर (वय ३३), पुष्पाबाई भवर (६०), सुनीता काळे (४०), मंदा काळे (६५), शिवकन्या काळे (३५), लक्ष्मीबाई शेळके (६५), संकेत काळे (१२), सुमित्रा काळे, राजेंद्र राठोड (३२), जनाबाई गावडे (४०), बाबूराव लिपणे (३०), राणूजी कोरटकर (५८), कोमल खटके (२८), तर भांबेरी येथील सुरेश केजभट, संगीता कनके, नंदा कनके, मीराबाई खरात, रेखा कनके, उषाबाई कनके, गयाबाई कनके, सुबिदर कनके, सीताबाई करमाळे, कमलबाई साळुंके, राधाकिशन कनके, सीताराम कनके, सूर्यभान कनके, जनाबाई कनके, मंगलबाई कनके, आदींचा समावेश असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची तब्बेत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी सुट्टी भगर खाणे टाळावे, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पराग नरवाडे यांनी केले.

Web Title: Poisoning of 30 people from Bhagari in Wadigodri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.