जालन्यात पोलिसांची आठ रोडरोमिओंवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:45 PM2018-10-30T19:45:17+5:302018-10-30T19:47:25+5:30
पोलिसांच्यावतीने विशेष मोहीम राबवत आठ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.
जालना : पोलिसांच्यावतीने आज विशेष मोहीम राबवत आठ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील वाढती गुन्हेगारी व शाळा कॉलेजमधील मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारातून रोडरोमिओंचा वाढता सुळसुळाट याचा बिमोड करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव, पोनि. बाळासाहेब पवार, पोनि. राऊत यांनी संयुक्त पणे रोडरोमिओवर धडक कारवाईचा बडगा उगारला.
शहरातील जेईएस महाविद्यालय, बारवाले महाविद्यालय, मत्स्योदरी महाविद्यालय, सरस्वती भूवन महाविद्यालय यासह आदी परिसरात कारवाई करत ८ रोडरोमिओंना ताब्यात घेतले. याप्रकरणी सदरबाजार, चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव, पोनि. बाळासाहेब पवार, पोनि. राऊत यांच्यासह कर्मचारी केली.
कारवाई सुरूच राहील
मागील काही दिवसांपासून रोडरोमिओंचा महाविद्यालयांच्या भागात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट होता. या अनुषंगानेच ही कारवाई करण्यात आली असून, येणाऱ्या काळातही कारवाई सुरुच राहणार आहेत.
- समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक