तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दाखल; वडील-भावाला ताब्यात घेताच झाला खुनाचा उलगडा

By दिपक ढोले  | Published: May 17, 2023 11:46 AM2023-05-17T11:46:44+5:302023-05-17T11:47:39+5:30

नेहमी वाद-विवाद करीत असल्याने कायमचे संपवले

Police arrive at youth's funeral; As soon as the father and brother were taken into custody, the murder was revealed | तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दाखल; वडील-भावाला ताब्यात घेताच झाला खुनाचा उलगडा

तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दाखल; वडील-भावाला ताब्यात घेताच झाला खुनाचा उलगडा

googlenewsNext

जालना : घरी नेहमीच वाद -विवाद करीत असल्याने जन्मदात्यासह भाऊ व एका विधी संघर्ष बालकाने बाजरीच्या शेतात नेऊन एका तरूणाचा काठीने मारहाण करून खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असतांनाच, पोलिस दाखल झाल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील शिरनेर येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. 

धर्मराज नारायण वैदय असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी नारायण शिवाजी वैदय, कर्णराज नारायण वैदय व एका १७ वर्षाचा विधी संघर्ष बालक (सर्व रा. शिरनेर, ता. अंबड) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. धर्मराज वैदय हा नेहमीच घरच्यांना शिवीगाळ करीत होती. शिवाय, वाद-विवादही करीत होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी त्याचे वडील नारायण वैदय, भाऊ कर्णराज वैदय आणि मयताच्या अल्पवयीन मुलाने बाजरीच्या शेतात नेऊन त्याला काठीने जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धर्मराज यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतदेह जळत होता. पोलिसांनी नारायण वैदय, भाऊ कर्णराज वैदय यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याचा घरच्यांनीच खून केल्याचे समोर आले. शिवाय, मारहाणीनंतर काढलेला एक फोटोही पोलिसांच्या हाती लागला. नंतर पोलिसांनी पुन्हा त्यांची चौकशी केली असता, त्यांनी खून केल्याची कबुली दिल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

डीवायएसपींची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, सपोनि. साजेद अहेमद, पोलिस उपनिरीक्षक स्कॉट यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी मोरे यांनी भेट दिली आहे.

 

Web Title: Police arrive at youth's funeral; As soon as the father and brother were taken into custody, the murder was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.