अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:48+5:302021-06-25T04:21:48+5:30
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तीर्थपुरी पोलिसांनी गुरुवारी पकडले. पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर ...
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तीर्थपुरी पोलिसांनी गुरुवारी पकडले. पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर असा सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंगरुळ येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती तीर्थपुरी पोलीस चौकीचे सपोनि. दीपक लंके, हेड कॉन्स्टेबल भगवान शिंदे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुद्रेगाव ते मंगरुळ शिवारात जाऊन पाहणी केली. यावेळी ट्रॅक्टर (क्रमांक एमएच.२२. एएम.४१९६) हे घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी त्याला पकडून ट्रॅक्टरसह वाळू असा ६ लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संशयित शरद आसाराम खरात (रा. मंगरूळ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल श्रीधर खडेकर करीत आहेत.