पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:24 AM2018-10-27T00:24:52+5:302018-10-27T00:25:52+5:30
मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी वय ३६ यांनी शुक्रवारी सकाळी भोकरदन येथील रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी वय ३६ यांनी शुक्रवारी सकाळी भोकरदन येथील रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल करण्यात आले.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत पोलीस कर्मचारी राजेंद्र गिरी हे मूळचे बदनापूर तालुक्यातील चिखली - दाभाडी येथील रहिवासी होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून कौटुंबिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पीएसआय ज्ञानेश्वर साखळे करीत आहेत.
रेल्वे खाली समोर येऊन वृध्दाची आत्महत्या
जालना : शहरातील सारवाडी येथील रेल्वे पुलाखाली येऊन एका वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. रमेशचंद्र नतमल संचेती (६०, रा. लोणार जि. बुलडाणा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रमेशचंद्र संचेती हे आपल्या मुलीकडे आले होते.
शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेस येत असतांना त्यांनी रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मत मृत्यृची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. साहेबराव वाघ, महिला कर्मचारी सय्यद जरीना हे करीत आहेत.