पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:10 AM2019-09-03T00:10:51+5:302019-09-03T00:11:47+5:30

जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली.

Police vigilance avoids burglary | पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

Next
ठळक मुद्देसदरबाजार : धारदार शस्त्रासह दुचाकी केली जप्त; अंधाराचा फायदा घेत चोरटे गेले पळून

जालना : जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली. ही घटना सोमवारी पहाटे घडली शहरातील व्यंकटेशनगर भागात घडली.
सदर बाजार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश रूपेकर व त्यांचे सहकारी सोमवारी पहाटेच्या सुमारास नवीन जालना भागात गस्त घालत होते. एका व्यापाºयाने काही चोरटे चोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती रूपेकर यांना संपर्क करून दिली. रूपेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ व्यंकटेशनगर भागात धाव घेतली.
पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चारही बाजुंनी घेरल्याने चोरट्यांनी हातातील शस्त्रे, दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
पोलिसांनी एक दुचाकी (क्र.एम.एच.३८- आर.३७२८) आणि एक धारदार शस्त्र जप्त केले. सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, पोलीस कर्मचारी समाधान तेलंग्रे, हुशे, इर्शाद पटेल, घोरपडे, जातीं ओहोळ, वेताळ यांनी केली.

Web Title: Police vigilance avoids burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.