बेटिंग प्रकरणी पोलीस आता सीडीआर तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:08 AM2018-04-26T01:08:58+5:302018-04-26T01:08:58+5:30
सध्या आयपीलचा धमाका सुरू असून, या क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आता महाराष्ट्र जुगार कायद्याचा आधार घेऊन, सट्टा घेणाऱ्यांसह तो लावणा-यांवरही कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या आयपीलचा धमाका सुरू असून, या क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आता महाराष्ट्र जुगार कायद्याचा आधार घेऊन, सट्टा घेणाऱ्यांसह तो लावणा-यांवरही कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
गेल्या चार ते पास दिवसांपासून, जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग अर्थात सट्टा लावण्यांवर दोन ठिकाणी छापे टाकून मोठी रक्कम तसेच बेटींग घेणाºयांना अटक केली आहे. आता महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलमांचा आधार घेत जे जे नागरिक या बुकींच्या संपर्कात येऊन जास्त पैसे मिळण्याच्या आमिषाने बेटिंग लावत आहेत, त्यांचे सर्व कॉल रेकॉर्डस बेटिंग घेणाºयांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मधून बेटिंग लावण्यासाठी कोणीकोणी मोबाईल केले होते, त्याचा तपशील गोळा करण्यात येत आहे. हा तपशील मिळाल्यावर संबंधितांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. सीडीआर प्रमाणेच बेटींग घेणाºयांकडे क्रिकेटच्या सामन्यातील प्रत्येक बॉलवर किती धावा होतील आणि कोण बाद होणार याचा सविस्तर प्रत्येक ओव्हर आणि बॉलनुसार नोंद असते. ही नोंद तपासणीचे काम सध्या आम्ही करत असल्याचे गौर यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री देखील सट्टा घेणा-यांवर छापा टाकून मोबाईल व रोख रक्कम तसेच नोंदी असलेले रजिस्टर जप्त केले आहे.