गावा-गावात वाचनालय सुरू करण्याचा पोलिसांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:24 AM2019-06-15T00:24:53+5:302019-06-15T00:26:00+5:30
पोलीस आपले मित्र बनण्यासाठी आतूर आहेत. आपणही पोलिसांना साथ द्यावी. पोलीस दल व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भविष्यात गावागावात वाचनालय सुरू करण्याचा संकल्प असून, पाणीदार गावाचे स्वप्न आज पूर्णत्वास आल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी केले.
अंबड : पोलीस आपले मित्र बनण्यासाठी आतूर आहेत. आपणही पोलिसांना साथ द्यावी. पोलीस दल व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भविष्यात गावागावात वाचनालय सुरू करण्याचा संकल्प असून, पाणीदार गावाचे स्वप्न आज पूर्णत्वास आल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांच्या प्रेरणेतून पोलीस दलाच्या वतीने अंबड तालुक्यातील कासारवाडी हे गाव पाणीदार करण्यासाठी दत्तक घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगण, अंबड पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासारवाडी येथील नदीपात्रात श्रमदानातून खोलीकरण- रूंदीकरण करून त्यावर मातीचा बंधारा बांधला आहे. या कामात ग्रामस्थांसह सामाजिक काम करणाºया संस्थांची पोलिसांना मदत मिळाली.
जलचळवळीचे जनक विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी कासारवाडी येथे शुक्रवारी श्रमदान केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी. शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. सिंघल यांनी कामाची पाहणी करून जल संवर्धनाबद्दल ग्रामस्थांशी संवाद साधला. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना सिंघल यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना सिंघल म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कोणतेही कार्य केले तर त्याला नक्कीच यश मिळते. माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आज या पदापर्यंत केवळ सकारात्मक दृष्टिकोनामुळेच पोहोचू शकत असेल तर इथे उपस्थित असणाºया प्रत्येकाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे नक्कीच शक्य असल्याचेही ते म्हणाले. या कार्यपूर्तीचा आनंद व पोलिसांप्रतीची कृतज्ञता यावेळी ग्रामस्थांच्या चेहºयावर दिसत होती. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.