जागतिक बँक प्रकल्पाला पोलिसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:59 IST2020-01-06T00:59:09+5:302020-01-06T00:59:30+5:30
जालना- औरंगाबाद महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

जागतिक बँक प्रकल्पाला पोलिसांचा अल्टिमेटम
दिलीप सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : जालना- औरंगाबाद महामार्गावरीलअपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर होणाऱ्या अपघातास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़
जालना - औरंगाबाद महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघातामधे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरील अपघाताकडे संबंधित अधिका-यांचे लक्ष वेधण्यासठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने या ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते़ या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे.
बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि. एम. बी. खडेकर यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक पत्र दिले आहे. यात म्हटले की, ‘आमच्या हद्दीमध्ये असलेल्या औरंगाबाद- जालना महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यात जिवित व वित्तहानी होत आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे़ रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पडलेले खड्डे बुजवावेत