दोन लाख ३७ हजार बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:30 AM2018-01-29T00:30:33+5:302018-01-29T00:30:52+5:30
शासनामार्फत राबविण्यात येणा-या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ० ते पाच वयोगटातल्या जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ६०४ बालकांपैकी दोन लाख ३७ हजार ८०६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
जालना : शासनामार्फत राबविण्यात येणा-या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ० ते पाच वयोगटातल्या जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ६०४ बालकांपैकी दोन लाख ३७ हजार ८०६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पिण्यापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने अंगणवाडी केंद्र, शाळा , प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, रेल्वेस्टेशन इ. ठिकाणी पोलिओ डोस देण्याची व्यवस्था केली होती. सकाळी येथील स्त्री व बाल रुग्णालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरात सायंकाळपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ग्रामीण भागात एक लाख ९५ हजार ४६३ तर शहरी भागातल्या ४२ हजार ३४३ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ३८ हजार ५०७ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. ज्या बालकांना रविवारी काही कारणांमुळे पोलिओ डोस देणे शक्य झाले नाही, अशा बालकांना शहरी व ग्रामीण भागात आगामी पाच दिवस घरोघर एक पथक पाठवून पोलिओ मात्रा पाजण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.