सभेचा ‘राजकीय आखाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:59 AM2018-04-01T00:59:52+5:302018-04-01T00:59:52+5:30

राजकारणातील वैयक्तिक हेवे-देवे सभागृहात न आणण्याचे संकेत शनिवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाळण्यात न आल्याचे दिसून आले. भाजपाच्या एका महिला सदस्याने विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी पक्ष सोडल्याच्या मुद्यावरून आक्षेप घेतला.

'Political arena' of the meeting | सभेचा ‘राजकीय आखाडा’

सभेचा ‘राजकीय आखाडा’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राजकारणातील वैयक्तिक हेवे-देवे सभागृहात न आणण्याचे संकेत शनिवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाळण्यात न आल्याचे दिसून आले. भाजपाच्या एका महिला सदस्याने विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी पक्ष सोडल्याच्या मुद्यावरून आक्षेप घेतला. सभागृहात राजकारण आणू नका या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे पालिका सभागृह काही वेळ राजकीय आराखडा बनल्याचे दिसून आले.
नगरपालिकेची चालू आर्थिक वर्षातील शेवटची सर्वसाधारण सभा शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्यासह सदस्यांची सभागृहात उपस्थिती होती.
सभागृहात विविध मुद्यांवर चर्चा सुरू असताना भाजप सदस्या संध्या देठे यांनी प्रभाग क्रमांक २३ मधील आदित्यनगर भागात एकाच जागेवर दोन कामांचा ठराव कसे घेतले? याबाबत खुलासा करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. सदस्य अरुण मगरे यांनी ही मागणी काँग्रेसमध्ये असतानाची असून, आता तुम्ही भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. सदस्य महावीर ढक्का यांनी कॉँग्रेसच्या लेटर पॅडवर मागणी, केल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजप-सेनेच्या सदस्यांनी सभागृतील मोकळ्या जागेत येवून सभागृहात कुणी राजकारण आणू नये, असे सांगितले. नगरसेवक जनतेतून निवडून येतो त्यास सभागृहात प्रश्न मांडण्याचा अधिकार असल्याचे भास्कर दानवे म्हणाले. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही, असे देठे म्हणाल्या. तर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असे बाला परदेशी यांनी सांगितले. नगराध्यक्षांच्या जागेवर बसण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष झाल्याने गोंधळ आणखीच वाढला. सदस्य म्हणून सदस्याला प्रश्न मांडण्याचा अधिकारी असून, एका कामाचे दोन ठराव घेणे चुकीचे असल्याचा खुलासा मुख्याधिकाºयांनी केल्यानंतर या मुद्यावर पडदा पडला. अंतर्गत जलवाहिनी व गटार योजनेच्या कामावर देखरेखीसाठी समिती का नियुक्त केली जात नाही, हा मुद्दा सदस्य पाचफुले यांनी वारंवार उपस्थित केल्यानंतर अशी कुठलीही तरतूद नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. जलवाहिनीचे काम परत होणार नाही. सर्व सदस्यांना विश्वासात घेवून तांत्रिक अधिकाºयांच्या देखरेखित हे कामे व्हावे, असे उपनगराध्यक्ष राऊत यांनी सांगितले. मोती तलावात भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसविण्याच्या काम मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. मामा चौकातील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण पालिकेने हटविले मात्र, या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यावसायिक इमारत मालकाने पालिकेची परवानगी न घेता, नालीत पाइप टाकले. यासाठीच अतिक्रमण काढले का? असा सवाल नजीब लोहार यांनी उपस्थित केला. शहरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाºया स्वच्छता निरीक्षकांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. सदस्य विजय पवार, गणेश राऊत, शेख शकील, जीवन सले आदींनी चर्चेत सहभाग घेतला. २१ विषयांना सभागृहात मान्यता देण्यात आली.
स्वच्छता निरीक्षकांना निलंबित करा : सर्वपक्षीय सदस्यांची मागणी
शहर अस्वच्छतेच्या मुद्याकडे सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक भूमिका मांडली. स्वच्छता निरीक्षकांचे कामावर लक्ष नसल्याने सफाईकामगार कामावर येत नाही. अस्वच्छतेमुळे नगरसेवकांना जनतेच्या रोषाला समोरे जावे लागते. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन करण्याची मागणी, उपनगराध्यक्ष राऊत, शशिकांत घुगे, विष्णू पाचफुले, अमीर पाशा, ज्ञानेश्वर ढोबळे, बाला परदेशी आदींनी केली. याची दखल घेत स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या केल्या जातील, असे नगराध्यक्षांसह मुख्याधिकाºयांनी सभागृहात सांगितले. पालिकेचे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष असून, बहुतांश भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला.

 

Web Title: 'Political arena' of the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.