परतूर, घनसावंगी तालुक्यात आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:54 AM2019-04-18T00:54:10+5:302019-04-18T00:54:27+5:30

परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुरूवारी मतदान होत आहे. त्यात जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांचा समावेश आहे.

Polling in Partur, Ghansawangi taluka today | परतूर, घनसावंगी तालुक्यात आज मतदान

परतूर, घनसावंगी तालुक्यात आज मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : परभणी लोकसभा मतदार संघासाठी गुरूवारी मतदान होत आहे. त्यात जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांचा समावेश आहे. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ५ लाख ९९ हजार ३८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या टप्प्यात परभणी जिल्ह्यातही मतदान होणार आहे. परभणी मतदार संघात जालना जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. यात घनसावंगी तालुक्यातील ११७, जालना ४२, अंबड तालुक्यातील ५३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परभणी लोकसभा मतदार संघासाठी जालना जिल्ह्यातील ५ लाख ९९ हजार ३८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात परतूर विधानसभा मतदार संघातील १ लाख ५३ हजार ७९७ पुरुष, १ लाख ३८ हजार ८३२ महिला मतदार असे एकूण २ लाख ९२ हजार ६२९ मतदार ३२६ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहे.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील १ लाख ५९ हजार ११० पुरुष, तर १ लाख ४६ हजार १७९ पुरुष असे एकूण ३ लाख ०७ हजार ६२ मतदार ३४० मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Web Title: Polling in Partur, Ghansawangi taluka today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.