महिलांचा पाण्यासाठी पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:27 AM2019-02-13T00:27:17+5:302019-02-13T00:28:03+5:30

शहरातील काझी मोहल्ला, सुतार गल्लीतील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त महीलांनी सोमवारी पालिकेवर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

Pollock for women's water | महिलांचा पाण्यासाठी पालिकेवर मोर्चा

महिलांचा पाण्यासाठी पालिकेवर मोर्चा

googlenewsNext

भोकरदन : शहरातील काझी मोहल्ला, सुतार गल्लीतील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त महीलांनी सोमवारी पालिकेवर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.
काझी मोहल्ला, सुतार गल्ली शहरातील जूनी वस्ती आहे. शहराचा झपट्याने विकास होत आहे. मात्र या दोन्ही वस्त्याच्या विविध समस्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी, रस्ते, नाल्यांची साफसफाई आदीची कामे ठप्प आहेत वारंवार निवेदन देऊनही याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून नळाला पाणी आले नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या बाबतीत मुख्याधिकारी यांना आपल्या समस्याचे निवेदन देण्यात आले आमच्या प्रश्नाना कडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत आहे तसेच परीसरातील हातपंप देखील नादुरुस्त असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे नमुद आहे. याकडे पालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी महिलांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली. यावेळी फसी बेग, शेख रईस, फईम खान, सलमा बी, आसेफा बी, जैतून बी, मुमताज बी, आसीया बी, सईदा बी,रशीदा बी, शमीम बेगम, सलीमा बी, आदीचे स्वाक्षºया आहेत. तसेच सुतार गल्ली येथील महीलांची उपस्थिती होती. दोन्ही गल्लीतील समस्याकडे न.प. प्रशासन लक्ष देणार असल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Pollock for women's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.