शासकीय रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:39+5:302020-12-24T04:27:39+5:30
परतूर : शहरातील शासकीय रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून, काटेरी झुडपांनी रस्ता ...
परतूर : शहरातील शासकीय रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून, काटेरी झुडपांनी रस्ता वेढला आहे. यामुळे रूग्णांसह नागरिक हैराण झाले आहे.
येथील शासकीय रूग्णालयात ग्रामीण भागातून रूग्ण उपचारासाठी येतात. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परंतु, मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर संबंधित विभागाने दोन महिन्यांपूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. अवघ्या दोन महिन्यातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. रूग्णांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. काटेरी बाभळीच्या फांद्या रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
फोटो
परतूर शहरातील शासकीय रूग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.