शेलुद येथील विवेकानंद नगर जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:37+5:302021-03-09T04:33:37+5:30
शेलूद हे गाव सात हजार लोकवस्तीचे आहे. नदीच्या पलीकडे उंच ठिकाणी वसलेले आहे. नवीन गावामध्ये विवेकानंदनगर मध्ये जिल्हा परिषद ...
शेलूद हे गाव सात हजार लोकवस्तीचे आहे. नदीच्या पलीकडे उंच ठिकाणी वसलेले आहे. नवीन गावामध्ये विवेकानंदनगर मध्ये जिल्हा परिषद पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे. बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे. शाळेवरील काही पत्रे उडून सुद्धा गेलेले आहे. शाळेचे दरवाजे व खिडक्या मोडलेल्या आहेत. एकेकाळी येथे लहान मुलांच्या हातामध्ये पेन्सिल देऊन अ आ ई चे धडे शिकवले जात होते. त्याच शाळेत सकाळी व रात्री काही ग्रामस्थ हातात डबे घेऊन शौचालयास जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर शाळेच्या व्हरांड्यात लहान मुले बिनधास्त शौचास बसतात. याबाबत ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच यांच्याकडे तक्रार करुनही काहीच उपयोग झाला नाही. परिणामी दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शासन नवनवीन शैक्षणिक धोरणे अंमलात आणत आहेत. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत आणि दुसरीकडे शाळा खोल्यांचा अशा प्रकारे दुरुपयोग केला जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षणाचा कायदा करण्यात आला आहे. सध्या काेरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळा खोल्यांचा काही जण दुरुपयोग करीत आहे. ही गोष्ट खेदजनक आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी सरपंच रमेश काळे यांनी सांगितले.
कोट
आम्ही स्वतः या शाळेची पाहणी केलेली आहे. शाळेची अवस्था अत्यंत बकाल झालेली आहे तर काही ग्रामस्थ शौचालयासाठी जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
रमेश काळे, माजी सरपंच, शेलूद
===Photopath===
080321\08jan_19_08032021_15.jpg
===Caption===
शेलूद येथील विवेकानंद नगर मधील जि. प. शाळेची अशी दुरवस्था झाली आहे.