लसूण पिकात अफूची लागवड; पोलिसांच्या धाडीत ९६ किलोची झाडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:44+5:302021-03-05T04:30:44+5:30
पोलिसांना चनेगाव शिवारातील एका शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी चनेगाव शिवारात धाड टाकली. यावेळी ...
पोलिसांना चनेगाव शिवारातील एका शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी चनेगाव शिवारात धाड टाकली. यावेळी चांदईकडे जाणा-या पांधी रस्त्यावरील गट क्र.-९१ मधील शेतात अफूची लागवड केल्याचे दिसून आले. मोबाइल फॉरेन्सिक लॅबचे पोकॉ. रविराज खलसे यांनी तपासणी करून यास दुजोरा दिला. पोलिसांनी ९६ किलो २०० ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत, याची बाजारातील किंमत जवळपास २४ लाख पाच हजार रुपये आहे. या प्रकरणी पोनि मारोती खेडकर यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती गणेश शेवाळे (रा. चनेगाव) यांच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि उबाळे हे करीत आहेत. ही कारवाई बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि मारोती खडेकर, सपोनि आय.एम. शेख, पोहेकाॅ बुनगे, काळुसे मोरे, दासर, ब्रह्मणावत, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागवे, पोउपनि राजपूत, पोहेकॉ हजारे, तंगे, लोखंडे, किशोर जाधव यांच्यासह नायब तहसीलदार एस.यू. शिंदे यांनी केली.
ही कारवाई नायब तहसीलदार एस.यू. शिंदे
===Photopath===
040321\04jan_11_04032021_15.jpg
===Caption===
आरोपीकडून जप्त केलेल्या मालासह पोलीस दिसत आहे.