भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून दानवेंचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:57 AM2019-01-28T00:57:24+5:302019-01-28T00:57:42+5:30

जालन्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक जालन्यात आयोजित करून एक प्रकारे भाजपचे प्रदेशाध्क्ष खा. राववसाहेब दानवेंचे यांचे शक्तिप्रदर्शनच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Power demonstration from BJP's Executive Committee meeting | भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून दानवेंचे शक्तिप्रदर्शन

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून दानवेंचे शक्तिप्रदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होऊ घातली आहे. ही बैठक जालन्यात आयोजित करून एक प्रकारे भाजपचे प्रदेशाध्क्ष खा. राववसाहेब दानवेंचे यांचे शक्तिप्रदर्शनच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही बैठक जालन्यात घेऊन आपल्या प्रचाराचाही एक प्रकारे श्रीगणेशा दानवे हे करत असल्याचे वास्तव आहे.
जालना लोकसभा मतदार संघात सलग चार वेळेस निवडून येण्याची किमया साधणारे खा. दानवे यांच्यासाठी यंदाची ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांची टक्कर यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन दानवेंनी आपले फासे फेकले आहेत. सोमवारी होणाऱ्या या बैठकीस भाजपचे सर्व मंत्री तसेच वरिष्ठ प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी येणार आहेत. या बैठकीत एकूण १२ प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात प्रामुख्याने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोणती रणनिती आखावी यावर मंथन येणार असल्याचे एका पदाधिका-याने सांगितले. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी प्रदेश कार्यकारिणीची ही शेवटची बैठक राहणार असल्याने पक्षपातळीवरील संघटन आणखी मजबूत करण्यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बैठकीस राज्यातील जवळपास ६०० पेक्षा अधिक पदाधिकारी हजर राहणार असून, रविवारी रात्रीच बहुतांश मंत्री जालन्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रात्री जालन्यात मुक्कामास येणार असा निरोप होता, त्यामुळे शासकीय विश्रामगृहाला छावणीचे स्वरूप आले आहे. मंत्री मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे या बैठकीला हजेरी लावतात काय याबद्दलही तर्क-वितर्क लावले जात आहेत.
बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याने ते जालन्यासाठी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Power demonstration from BJP's Executive Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.