पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:13 AM2018-02-23T00:13:53+5:302018-02-23T00:13:57+5:30

जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.

The power supply of forty-five villages cut | पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा तोडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील पाच परिमंडळांमधील सव्वा चार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात पाच परिमंडळांतील ४५ गावांतील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित करण्यात आला.
जिल्ह्यातील विजेचा वापर करणा-या घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणने विभाग एक व दोन अंतर्गत वाढत्या थकबाकीच्या वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तीन ते चार वर्षांपासून वीज देयक न भरलेल्या ४५ गावातील दोन हजार २४५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण ४ कोटी २१ लाख ८८ हजार थकबाकी आहे. यामध्ये जालना ग्रामीण उपविभागातील हिरवर्डी, नसडगाव, हस्ते पिंपळगाव, अंबड उपविभागातील भांबेरी, दौडगाव, सौंदलगाव, डोमेगाव, वैणापुरी, नालेवाडी, डोणगाव, आपेगाव, डोलारा, करंजळा, कुरण, डोमलगाव, धर्मापुरी, गोंदी, घुंगर्डे हादगाव, तर घनसावंगी उपविभागातील घानेगाव, लिंबी, नागोबाची वाडी, उक्कडगाव, विरेगाव, मुधेगाव, रव्हणा, बोरंगाव तांडा, घोंन्सी तांडा, जोगलादेवी, कोठी, श्रीकृष्णनगर तांडा, गणेशनगर तांडा, शेवता या गावांचा समावेश आहे. आपला वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकधून संताप व्यक्त होत आहे.
वीज बिल वसुलीच्या नावाखाली महावितरणने घनसावंगी तालुक्यातील १६ व अंबड तालुक्यातील १४ गावांचा विजपुरवठा बंद केला असल्याने बारावीच्या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थांचे नुकसान होत आहे .या परिक्षेचा कालखंड संपेपर्यंत तातडीने विद्युत पुरवठा चालु करण्याच्या सूचना आ.राजेश टोपे यांनी अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांना दिल्या आहेत. घनसावंगी तालुक्यातील ७१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत जोडणी देखील महावितरणने खंडित केल्याने त्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याही ठिकाणचा विद्युत पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. राजेश टोपे यांनी दिला आहे.

Web Title: The power supply of forty-five villages cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.