प्रभाकर शेळके यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:40 AM2019-06-04T00:40:45+5:302019-06-04T00:40:51+5:30
स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्था परिवर्तन हेच जीवन ध्येय -प्रा.समाधान(बाबा) दहिवाळ पुरोगामी सामाजिक आणि सांस्कृतिक महासंघ आयोजित स्मृतिशेष रावसाहेब नाथाबा दहिवाळ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जालना येथील कवी, लेखक, डॉ. प्रभाकर शेळके यांच्या ‘जातीअंताचे हूंकार’ या काव्यसंग्रहाला मिळाला.
औरंगाबाद येथे रविवारी एका विशेष सोहळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समीक्षक, विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स. सो. खंडाळकर, धोंडोपंत मानवतकर, प्राचार्य हसन इनामदार आदींची उपस्थिती होती. डॉ. शेळके यांच्या या पुरस्काराबद्दल आ. राजेश टोपे, सचिव मनिषा टोपे, डॉ. गायकवाड, विजय कनुजे, रामकिसन बिरनावळे आदींनी कौतूक केले.