समन्वयकपदी प्रमोदकुमार रत्नपारखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:53+5:302021-07-03T04:19:53+5:30
शकील यांचा सत्कार जालना : मार्च २०१९ पासून ते जून २०२१ या कालावधीतील कोरोना काळात उत्कृष्ट काम ...
शकील यांचा सत्कार
जालना : मार्च २०१९ पासून ते जून २०२१ या कालावधीतील कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगरसेवक शेख शकील यांना ‘कोरोनायोद्धा’ पुरस्कार देण्यात आला. या वेळी राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, आ. कैलास गोरंट्याल हे हजर होते.
अरविंद तिरपुडे यांचा सत्कार
जालना : पिरपिंपळगाव शाळेचे मुख्याध्यापक अरविंद तिरपुडे यांचा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी राज्याध्यक्ष अरुण जाधव, राज्य नेते विलास इंगळे, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष पी. यू. अरसूड, शंकर बोर्डे, अच्युत साबळे, परमेश्वर साळवे, उपाध्यक्ष सावता तांबेकर, बबन शिंदे, विष्णू सोनटक्के, दिनकर डोके आदींची उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.
ग्रामपंचायतकडून गावात वृक्षारोपण
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले. गाव आणि परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार झाडे लावण्यात येतील, असे ग्रामविकास अधिकारी एस. बी. साळवे यांनी सांगितले. या वेळी तलाठी अभय कुलकर्णी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुक्तार बागवान, रामभाऊ दुधे, प्रमाेद गावंडे, कौतिक पांढरे, विठ्ठल पांढरे, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे निवेदन
घनसावंगी : घनसावंगी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात जि.प.च्या सीईओंना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची किमान वेतन वाढ, भविष्य निर्वाह निधी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. या वेळी तालुकाध्यक्ष प्रभू गायकवाड, संजय रंधे, कोषाध्यक्ष संतोष सस्ते, सदस्य गणेश माने, राजू थोरात, संतोष साळवे, त्र्यंबक राऊत आदी उपस्थित होते.
दानापूर परिसरात वृक्षारोपण
दानापूर : दानापूर आरोग्य उपकेंद्र येथे वृक्षारोपण करण्यात करण्यात आले. शिवाय, कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. दानापूर, बाभूळगाव, वालसा, सिपोरा बाजार येथील आरोग्य उपकेंद्राच्या प्रांगणात लिंब, काशीद, अशोका अशा विविध रोपट्यांची लागवड करण्यात आली. त्यानंतर आरोग्य उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कर्मचारी उपस्थित होते.
तंत्रस्नेही शिक्षकांची ऑनलाइन बैठक
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर केंद्रांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची ऑनलाइन अध्यापन करण्यासंदर्भात दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बैठक झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर्यन इंगळे हे होते. ऑनलाइन अध्यापनासंदर्भात केंद्रप्रमुख पुंडलिक सोनुने यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या वेळी रमेश बावस्कर, के. डी. वाघ, आर. के. खोकले आदी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
जालना : शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष माधव शिंदे यांना मारहाण करणाऱ्या दैठणा येथील पोलिसांवर कारवाई करावी; अन्यथा पोलीस ठाण्यास कुलूप लावून आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष उत्तम काळे, शाखा अध्यक्ष नितीन देशमुख, पिराडी मेहेत्रे आदी उपस्थित होते.
कृषी दिनानिमित्त गौरव सोहळा
घनसावंगी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गुरुवारी ‘कृषी दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सभापती भागवत रक्ताटे, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, संभाजी देशमुख आदी उपस्थित होते.