जेईईमध्ये यंदाही 'प्रीमियर'ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:44+5:302021-09-18T04:32:44+5:30
जालना : नॅशनल टेस्टींग एजन्सीची जॉइंट एट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन्स २०२१ सेशन ४ चा निकाल जाहीर झाला आहे. ...
जालना : नॅशनल टेस्टींग एजन्सीची जॉइंट एट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन्स २०२१ सेशन ४ चा निकाल जाहीर झाला आहे. यात जालना शहरातील अंकुश सरांच्या प्रीमियर इन्स्टिट्यूट
ऑअ
सायन्सने रेकॉर्डब्रेक यश मिळविले आहे. यामध्ये तन्वी व्यंकटेश पिंपरीकर हिने ९९़.७२ टक्के प्राप्त करून सर्वसाधारण ऑल इंडिया रँकींग ३०९१ प्राप्त झाली आहे़
इंजिनिअरिंगसाठी देशपातळीवरची जेईई परीक्षा अत्यंत महत्त्वाची समजली जाते़ यासाठी असणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा असून, दोन वर्षांपासून अंकुश सरांच्या प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये सर्व विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमाची जोरदार तयारी करून घेतली. मागील दोन वर्षांपासून या इन्स्टिट्यूटने दमदार निकाल दिले आहेत़ ही परंपरा कायम राखत यावर्षीही तन्वी व्यंकटेश पिंपरीकर हिने ९९़.७२ टक्के तर (प्रत्येक विषयाचे- भौतिकशास्त्र -९८़.७६ टक्के, रसायनशास्त्र-९९़.९० टक्के, गणित-९९़.३५ टक्के) मिळवून जालना जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. तन्वी ही दोन वर्षांपासून १० ते १२ तास अंकुश सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास करीत होती़ यासाठी तिला अंकुश सर आणि त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. या परीक्षेत तिला सर्वसाधारण ऑल इंडिया रँकींग ३०९१ ही प्राप्त झाली आहे़ तर इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रीकृष्ण उदय सावंगीकर - ९८़.२८ टक्के, श्रेयस भुजंगराव जैवाळ-९५़.७५ टक्के, साक्षी महेश सोनी-९०़.९८ टक्के आणि साक्षी सतीश देशमुख-९०़.६४ टक्के यांचा समावेश आहे़
पासपोर्ट ओटो आहेत