सर्वधर्मीय विश्वशांती सोहळ्याची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:43 AM2019-01-22T00:43:09+5:302019-01-22T00:44:02+5:30
तुपेवाडी येथील खडेश्वरी महाराज शिवशक्ती आश्रमात विश्वशांती धर्म सोहळ््यासह सर्व धर्म समभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प. पू. पवन भारती खडेश्वरी महाराज यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : तुपेवाडी येथील खडेश्वरी महाराज शिवशक्ती आश्रमात विश्वशांती धर्म सोहळ््यासह सर्व धर्म समभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प. पू. पवन भारती खडेश्वरी महाराज यांनी दिली आहे.
येथील आश्रमामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सामुदायीक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, श्रीराम कथा आणि शिवलीलामृत तसेच अखंड हरिनाम सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ््याला करवीर पीठाचे प. पू. जगतगुरू शंकर आचार्य विद्यार्नसिंग भारती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याविषयी खडेश्वरी महाराज म्हणाले, महायज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिक कार्यक्रमा बरोबरच विविध सामाजिक उपक्रम येथे राबवले जाणार आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ््याचे आयोजन करण्यात आले असून सर्वधर्मीय संत महंतांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सलग सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात ग्रामस्वच्छता अभियान, शेती विषयी व्याख्यान, शिवचरित्र, यज्ञ आणि पर्यावरण, सर्वधर्म समभाव, संस्कार आणि संस्कृती आदी विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील शिवशक्ती आश्रमात वर्षभर गो संवर्धन, रक्तदान शिबीर, अन्नक्षेत्र, नित्य चतुर्थी अन्नदान, आरोग्य शिबीर, ज्ञानदान, वृक्षारोपण, साधू- संत, महंतांची सेवा व गरजू मुलांसाठी शैक्षणिक सहकार्य नियमित केले जात असून राष्टÑीय संत, पुरूष व हुतात्मे यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. तसेच यंदा विवाह नोंदणी येथे सुरू करण्यात आली आहे. यामुळे इच्छुकांनी तातडिने नाव नोंदणी करावी, असे आवाहन खडेश्वरी महाराजांनी केले आहे. एकूणच या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.