शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:21 AM2018-02-23T00:21:20+5:302018-02-23T00:21:29+5:30
: शहरात प्रथमच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातून योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलश सिडसच्या मैदानावर आयोजित या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी सायंकाळी खा. दानवे यांनी तयारीची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात प्रथमच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातून योगगुरु स्वामी रामदेव महाराज यांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कलश सिडसच्या मैदानावर आयोजित या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी सायंकाळी खा. दानवे यांनी तयारीची पाहणी केली.
शिबिरानिमित्त स्वामी रामेदव प्रथमच जालना दौ-यावर येत आहेत. शुक्रवारी दुपारी ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. शनिवारी दुपारी चार वाजता कलश सिड्स येथे भोकरदन तालुक्यातील ग्रामस्थांशी स्वामी रामदेव ग्रामसभेतून संवाद साधणार आहेत. रविवारी दुपारी महिलांसाठी विशेष शिबीर होणार आहे. ८० हजार लोक सहभागी होणार असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मंठा चौफुली ते अंबड चौफुली हा रस्ता शनिवार ते सोमवारपर्यंत सकाळी चार ते नऊ या वेळेत बंद राहणार आहे. रविवारी दुपारी तीन ते सात या वेळेत या मार्गावरील वाहतूक बंद राहील. ही वाहतूक मंठा चौफुलीहून कन्हैयानगर, नवीन मोंढा मार्गे औरंगाबादकडे सुरू राहील. अंबड चौफुलीकडून जाणारी वाहने जिल्हा परिषद, पोलीस मोतीबाग, औरंगाबाद चौफुली, भोकरदन नाका, नवीन मोंढा मार्गे मंठा चौफुली, अशी सुरू राहील, असे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी कळविले आहे.