रासायनिक खतांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:51 AM2019-05-12T00:51:57+5:302019-05-12T00:53:04+5:30

यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.

Price hike in chemical fertilizers | रासायनिक खतांची दरवाढ

रासायनिक खतांची दरवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत हंगामापूर्वीच खत उत्पादन कंपन्यांनी दरवाढ केली आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात ५० किलोच्या प्रति बॅगला १०० ते २०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना चांगलाच शॉक दिला आहे.
जिल्ह्यात सलग चार वर्षापासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी हैराण आहेत. यामुळे शेतीच्या व्यवसाय आर्थिक आतबट्ट्यात ठरत आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतीत लावलेला खर्चही हाती पडलेला नाही. यामुळे शेतक-याचा वर्षभराचा हिशोब बिघडला आहे. अशा अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करुन चांगलाच धक्का दिला आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतक-यांच्या खिशाला न परवडणारी आहे.
५० किलो वजनाच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यत वाढ करण्यात आल्याने शेतक-यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.
गतवर्षी शेतक-यांना या खताची बॅग केवळ ९९७ रुपयांत मिळत असे आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच एका बॅगमागे १०३ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.
दुष्काळ आणि नापिकीसारख्या संकाटामध्ये पिचलेल शेतक-यांना खताच्या दरमध्ये वाढ केल्याने शेतक-यात संताप आहे.
याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
डीएपी खताच्या एकाबॅगेसाठी पूर्वी १ हजार २८० रुपये मोजावे लागत होेते. आता शेतकºयांना डीएपी च्या एका बॅगेसाठी १ हजार ४७७ रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतक-यांच्या खिशाला १९७ रुपयांची जास्तीची झळ बसणार आहे.
४१०: २६ : २६ या खताची बॅग गतवर्षी शेतक-यांना १ हजार १८३ रुपयांना मिळत असे आता १ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.
४म्हणजेच एक बॅगमागे २१७ रुपयांची वाढ झाली. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे.

Web Title: Price hike in chemical fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.