जालना बाजारपेठेत भाज्यांचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:53 AM2018-12-13T11:53:44+5:302018-12-13T11:54:59+5:30
भाजीपाला : जालन्यातील बाजारपेठेत सध्या विदर्भातून कोबी आणि फूलकोबीची आवक चांगली आहे.
जालना येथील भाजीपाला बाजारात सध्या पाहिजे तशी तेजी नसल्याने ग्राहकांना स्वस्तात भाजीपाला मिळत आहे. कुठलीच भाजी सध्या ३० रुपयांपेक्षा अधिक नसल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळाली. जालन्यातील बाजारपेठेत सध्या विदर्भातून कोबी आणि फूलकोबीची आवक चांगली आहे.
फूलकोबी व पत्ताकोबीला घाऊक बाजारात २० रुपये किलो भाव मिळत असून, किरकोळ बाजारात हा भाव २६ रुपये आहे. सध्या कुठलेच सणवार नसल्याने भाज्यांचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मेथी, वाटाण्याच्या शेंगा, पालक, कोथिंबीर, शेपू, अद्रकचे भावही गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले असून, मेथीला ७० रुपये शेकडा दर मिळाले. टॉमेटॉमध्ये किरकोळ दरवाढ झाली असून १० किलोच्या कॅरेटला २२० रुपये भाव मिळाला. काशीफळाला चांगली मागणी वाढली असून, बाजारात बीट मोठ्या प्रमाणात आले आहे.