शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:27 AM2019-10-19T00:27:11+5:302019-10-19T00:28:03+5:30

दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जालना शहरास महत्त्व येणार आहे. अनेक मोठे उद्योग शहरात येत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अर्जुन खोतकर यांनी केले.

Prioritized infrastructure in the city | शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले

शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले

Next
ठळक मुद्देअर्जुन खोतकर : काँग्रेसच्या राजवटीत विकासाला खीळ बसली होती

जालना : काँग्रेसच्या राजवटीत जालना शहरातील विकासाला बसलेली खीळ महायुतीच्या सरकारने दूर केली. थेट निधी देऊन शहराचा विकास वेगवान केला आहे. रस्ते, अंतर्गत जलवाहिनी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. दिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जालना शहरास महत्त्व येणार आहे. अनेक मोठे उद्योग शहरात येत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अर्जुन खोतकर यांनी केले.
जालना शहरातील दर्गा वेस व शंकर नगर भागात गुरूवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड.ब्रम्हानंद चव्हाण, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, सतीश वाहुळे, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, संतोष जांगडे, राम सतकर, ज्ञानेश्वर सुपारकर, घनश्याम खाकीवाले, प्रा. राजेंद्र भोसले, देवीलाल भगत, महेश दुसाने, शैलेश घुमारे, भरत कुसुंदल, दिनेश भागत, दुर्गेश काठोठीवाले, गणेश सुपारकर, संतोष सलामपुरे, सुशील भावसार, लखन कणीसे, संतोष जमधडे आदींची उपस्थिती होती.
खोतकर म्हणाले, सत्तेचा उपयोग आपण जनतेसाठी केला म्हणूनच मतदार आमच्या पाठीशी उभे राहतात. जनतेचे प्रेम हाच आपला श्वास असून, दिल्ली ते गल्ली एकच सरकार असेल तर विकासासाठी त्याचा फायदा होतो. विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यास विकासाला खीळ बसेल, याचा विचार करून सुज्ञ शहरवासियांनी विकासाचे भागीदार होण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही खोतकर यांनी केले.
यावेळी रावसाहेब राऊत, विष्णू पाचफुले, सतीश वाहुळे, शैलेश घुमारे, प्रा. राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले तर ज्ञानेश्वर सुपारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील महिला, नागरिक व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
खोतकरांना विजयी करा-पकंजा मुंडेचे आवाहन
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. एका व्हिडीओ क्लिपव्दारे त्यांनी हे आवाहन केले असून मुंडे आणि खोतकर यांचे पारिवारीक संबंध असून अर्जुन खोतकर हे माझे मोठे बंधु आहेत, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी केले आहे.

Web Title: Prioritized infrastructure in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.