शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले : टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:28+5:302021-02-05T07:58:28+5:30

त्यात खरिपासाठी ९९० कोटी, तर रबीसाठी २७३ कोटी रुपयांचा समावेश आहे. कर्ज वाटपासह अतिवृष्टीमुळेदेखील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. ...

Prioritized the interests of farmers: Tope | शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले : टोपे

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले : टोपे

Next

त्यात खरिपासाठी ९९० कोटी, तर रबीसाठी २७३ कोटी रुपयांचा समावेश आहे. कर्ज वाटपासह अतिवृष्टीमुळेदेखील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यासाठीदेखील राज्य सरकारने भरीव अनुदान दिले असून, जवळपास एक हजार कोटी रुपयांचे अनुदान देऊन ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. कोरोना काळात गरिबांना अवघ्या पाच रुपयांत पोटभर जेवण मिळावे म्हणून योजना राबविली होती. त्यात जिल्ह्यातील १५ केंद्रांतून चार लाख २० हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतल्याचे टोपे म्हणाले.

नानाजी देशमुख कृषी योजनेंतर्गत ३६३ गावांची निवड केली असून, या योजनेतून आतापर्यंत जवळपास १३ हजार ३१४ जणांना एकशे एक कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती देण्यात आली. या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेच्या सीईओ निमा अरोरा यांच्यासह अन्य खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

Web Title: Prioritized the interests of farmers: Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.