खत वाटपाला येणार अडचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:37 AM2018-06-04T00:37:29+5:302018-06-04T00:37:29+5:30
सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
खतांचा काळा बाजार रोखला जावा, अनुदानित खते ज्या विभागासाठी मंजूर आहेत, त्याच भागातील योग्य लाभार्थ्यांना विकली जातात का ? याची आॅनलाइन नोंद घेता यावी आदी कारणांमुळे राज्यशासनाने मागील वर्षापासून सर्व प्रकारची खते ई-पॉस मशीनद्वारे विक्री करणे बंधनकारक केले आहे. खते खरेदीसाठी जाताना शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत घेवून जाणे गरजेचे आहे. जालना शहर व तालुका पातळीवर, तसेच बाजार गावांमध्ये मिळून जिल्ह्यात सुमारे १२०० कृषिसेवा केंदे्र आहेत.
यातील जवळपासून ६४० कृषिकेंद्र चालकांना ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित कृषिसेवा केंद्र चालकांकडे मशीनच उपलब्ध नाही. जिल्ह्याला मागील वर्षी प्राप्त झालेल्या कृषीकेंद्र चालकांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अन्य जिल्ह्याला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक लाख ८३ हजार २२६ मेट्रिक टन खताचे आवंटन मजूर आहे. त्यातील एक लाख ६६ हजार २८० मेट्रिक टन जिल्ह्यास उपलब्ध झाले आहे. या पैकी गेल्या आवठवड्यात ४६ हजार ६०२ मेट्रिन टन बाजारपेठेत दाखल झाले आहे. ई-पास मशीनअभावी खत वाटपास अडचणी येत आहेत. शिवार दिलेल्या वेळेत खतांची विक्री न केल्यास कृषिसेवा केंद्र चालकांच्या अडचणीत भर पडणार आहे.
कृषिकेंद्राना परवाने देण्याचे अधिकारी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास आहे. त्यामुळे कृषीसेवा केंद्राची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यास आवश्यक ई-पास मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी दिल्या आहेत.
ऐन खरिपाच्या तोंडावर सहाशेंवर कृषिकेंद्र चालकांकडे ई-पॉस मशीन नसल्यामुळे त्यांना शेतकºयांना खत विक्री करताना अडचण येणार आहे. शिवाय खताची वेळेत विक्री न झाल्यास विक्रेत्यांकडील खत तसेच पडून राहिल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय शेतकºयांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सहाशेंवर मशीन उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाला कसरत करावी लागणार आहे.