आजपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:39 AM2019-03-28T00:39:26+5:302019-03-28T00:39:34+5:30

जालना लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरूवार पासून प्रारंभ होणार आहे.

Process of application for candidature from today | आजपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया

आजपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यास गुरूवार पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळेत हे अर्ज दाखल करता येणार आहेत. याच्या तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात हे उमेदवारी अर्ज भरता येणार असून, उमेदवारी अर्ज भरताना केवळ पाच जणांनाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना ते इनकॅमेरा होणार आहेत. अर्जासोबत कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे, याचा तपशील यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिला आहे.
निवडणुकीच्या कामांची तयारी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरात सुरू असून, बैठकांवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी यावेळी दिली. गुरूवारी पाच निवडणूक निरीक्षक जालन्यात दाखल होणार असून, त्यांच्या निवासाची तसेच त्यांना मतदार संघात फिरण्यासाठी वाहने तैनात करण्यात आली आहेत. बुधवारी दुपारी जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्ज भरण्याच्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके आदींची उपस्थिती होती.
दुसºया दिवशीही यंत्रांची रवानगी
जालना लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानभा मतदारसंघात मतदान यंत्र पोहोचवण्याचे काम मंगळवार प्रमाणेच बुधवारीही सुरू होते. यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोडला मतदान यंत्रे रवाना करण्यात आल्याची माहिती असून, जालना, बदनापूर तसेच भोकरदन मतदारसंघातही तहसीलदारांकडे हे यंत्र पोहोचते करण्यात येत आहेत.

Web Title: Process of application for candidature from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.