लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

By विजय मुंडे  | Published: December 30, 2023 08:31 PM2023-12-30T20:31:56+5:302023-12-30T20:32:30+5:30

"ही मराठवाड्यासाठी आनंदाची बाब"

Production of 'Vande Bharat' to be held in Latur says Devendra Fadnavis | लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

विजय मुंडे, जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युरोप, अमेरिकेत ज्याप्रमाणे ट्रेन असतात त्यांच्या तुलनेत दर्जेदार अशा भारतीय बनावटीच्या वंदे भारत रेल्वे तयार करण्यात आल्या आहेत. आज महाराष्ट्रातील सहावी वंदे भारत रेल्वे जालन्यातून धावत असून, ही जालनाच नव्हे तर मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे. यापुढे लातूर येथील कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी दूरदृष्यप्रणालीद्वारे जालना- मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात रेल्वेचा अभूतपूर्व विकास होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे यासाठी विशेष प्रयत्न आहेत. राज्यात एक लाख सहा हजार कोटींची रेल्वेची कामे सुरू आहेत. यंदा १३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यातून अनेक कामे होणार आहेत. जसजसे रुळांचे मजबुतीकरण होईल तसतशी ही ट्रेन पुढील दोन वर्षांत तासी २५० किलोमीटरच्या वेगाने चालेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: Production of 'Vande Bharat' to be held in Latur says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.