शिवाजी महाराज वरिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:09+5:302021-01-16T04:35:09+5:30
देवकी महाविद्यालयात नामविस्तार दिन साजरा जालना : पीर पिंपळगाव येथील देवकी महाविद्यालयात विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ...
देवकी महाविद्यालयात नामविस्तार दिन साजरा
जालना : पीर पिंपळगाव येथील देवकी महाविद्यालयात विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी बुटखेडा येथील शालीक बनकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास बद्रीनाथ मोहिते, नितेश बनकर यांच्यासह प्राध्यापकांची उपस्थिती होती.
कडेगाव येथे नारी सन्मान कार्यक्रम
बदनापूर : तालुक्यातील कडेगाव येथे जिजाऊ जयंतीनिमित्त नारी सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे यांच्या वतीने गावातील कोरोना योद्धा महिलांचा गौरव करण्यात आल. कार्यक्रमास हरिश्चंद्र शिंदे, भीमराव जाधव, दत्तू निंबाळकर, गजानन काटकर, लहू मोरे, राम काळे, युनूस शहा, कल्याण घुले, संदीप मोरे आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा
भोकरदन : विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शहरातील रमाईनगर भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक बोर्डे, प्रदीप जोगदंडे, रवि मोरे, सांडू जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती, शिवाय सिल्लोड कॉर्नर परिसरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, शिवाय युवापिढीही दारूच्या आहारी जात असून, याचा त्रास महिला, मुलींना सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.