मालमत्ता कर; जालन्यात महिनाभराची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:43 AM2018-10-25T00:43:38+5:302018-10-25T00:44:18+5:30
जालना नगर पालिकेने मालमत्ता कर वाढीसाठीचे फेर मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस नागरिकांना मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मालमत्ता करासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी आता २८ नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर पालिकेने मालमत्ता कर वाढीसाठीचे फेर मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस नागरिकांना मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मालमत्ता करासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी आता २८ नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.
जालना नगर पालिकेकडून मालमत्तेचे फेरमुल्यांकन करण्यासाठी एका सर्वेक्षण एजंसीची नेमणूक करण्यात आली आहे. या एजंसीने जवळपास ६० शहराचे सर्वेक्षण केले असून, बहुतांश नागरिकांना वाढीव कर आकारणी संदर्भात नोटीस प्राप्त झाल्या आहेत. या नोटीस मिळाल्यावर अनेकांनी थेट पालिकेत जाऊन आक्षेप दाखल केले असून, आतापर्यंत जवळपास अडीच हजार आक्षेप आले असल्याचे प्रशासकीय पातळीवरून सांगितले. एकूणच नागरिकांना या वाढीव कर फेरमुल्यांकना संदर्भात आपले म्हणणे मांडता यावे आणि कोणावरही ही करवाढ करताना अन्याय होऊ नये म्हणून नगराराध्यक्षा संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून ही आक्षेप दाखल करण्यासाठीच्या अंतिम तारेखत एक महिन्याची मुदतवाढ मंजूर केली आहे. या वाढीव मुदतीचा लाभ संबंधित नागरीकांनी घ्यावा असे आवाहन संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.
काही नवीन असल्यास करवाढ
अनेक भागातील नागरिकांनी त्यांच्या मूळ बांधकामात काही बदल केले असतील तर करवाढ अटळ आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने जवळपास प्रत्येक घरात जाऊन अत्याधुनिक पध्दतीने घरांचे क्षेत्रफळ तसेच तेथील नवीन बांधकामाची पाहणी केली आहे. तसेच ज्या मालमत्तेचे सर्वेक्षण झाले आहे.त्या घराचे छायाचित्रही नोटीसवर देण्यात आले आहे.