१०० बसथांब्यांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:59 AM2018-12-23T00:59:38+5:302018-12-23T01:00:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील विविध मार्गांवर १०० बस थांबे नव्याने होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर ४१ बस थांब्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील विविध मार्गांवर १०० बस थांबे नव्याने होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर ४१ बस थांब्याचे नूतनीकरण होणार आहे. या बाबतचा अहवाल काही दिवसांपूर्वी विभागीय एस. टी. कार्यालयाने मध्यवर्ती कार्यालय मुंबईकडे प्रस्ताव पाठविला आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठी गावे आणि बाजारपेठ आहे. पण, ठराविक ठिकाणीच बस थांबे नसल्याने अनेक बसचालक व वाहक मनमानी पद्दतीने कोठेही बस थांबवत आहेत. यामुळे अनेकदा नागरिकांची बस पकडण्यासाठी गैरसोय होत आहे. तर अनेक ठिकाणच्या बस थांब्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी यांना ऊन- वारा व पावसामध्ये उभा राहण्याची वेळ अनेकदा येत आहे. याबाबत दै. ‘लोकमत’ने वारंवार वृत्त छापले होते. अखेर याची दखल काही दिवसांपूर्वी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने घेतली आहे. या कार्यालयाने जालना येथील एसटी विभागीय कार्यालयाकडे नव्याने आवश्यक असलेल्या बस थांब्याची आकडेवारी व नुतणीकरणासाठी आवश्यक असलेल्या बस थांब्याची माहिती मागीतली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी येथील विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागाने १५ महामार्गावरिल १०० बस थांबे नवीन करणे व ४१ बस थांब्याचे नुतणीकरणाचा प्रस्ताव आहे.
अंदाजित खर्च
नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १०० बस थांब्यापैकी नऊ बस थांब्याचा खर्च प्रत्येकी पाच लाख रूपये व उर्वरित ९१ बस थांब्याचा प्रत्येकी ३ लाख रूपये अंदाजीत खर्च धरण्यात आला आहे.