अंबड येथे निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:53 AM2018-04-18T00:53:08+5:302018-04-18T00:53:08+5:30
कठुवा, उन्नाव व सुरत येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अंबड शहरात सर्वपक्षीय नागरी समितीच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / अंबड : कठुवा, उन्नाव व सुरत येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अंबड शहरात सर्वपक्षीय नागरी समितीच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शहरासह तालुक्यातून हजारो नागरिकांनी सहभाग घेत अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाईच मागणी केली.
शहरातील नाथे्रकर चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा संपेपर्यंत व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील सर्व व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर पाच मुलांनी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले. देशाची प्रतिमा मलिन करणाºया अत्याचाराच्या या घटनेतील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारिप बहुजन महासंघ
भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाºया आरोपींना शिक्षा न देता शासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष दीपक डोके, विनोद दाडंगे, आनंद म्हस्के, अर्जुन जाधव, कैलास जाधव, दीपक जाधव, सखाराम जाधव, संदीप ढिल्पे, राष्ट्रपाल जाधव, बबन जाधव, आनंद म्हस्के, राजेंद्र खरात,गौतम वाघमारे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.
बहुजन समाज पार्टी
अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे, सुधाकर बडगे, हरिश रत्नपारखे, रोहिदास गंगातिवरे रोहिदास गंगातिवरे, नीलेश सोनवणे, निवृत्ती बनसोडे, विवेक दहिवाले, नितीन मोरे, सोपान डोईफोडे, शेख हसनोद्दीन, विनोद बिरसोने, शेख उमर, सिध्दार्थ मोरे, जॉन्सन आठवले, किशोर बोर्डे, अफसर चौधरी आदीची उपस्थिती होती.
जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध
देशात झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. या घटनेचा तपास लावून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, प्रकरणाची जलदगती न्यायालयात याची सुनावणी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विमल आगलावे, प्रमिला सूर्यवंशी, गंगा काळे, शेख शाहीन, शेख शाहिस्ता, सुमन निर्मल, संजना भालेराव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.