परतूर शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:41 AM2019-07-06T00:41:04+5:302019-07-06T00:42:20+5:30

मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

Protest rally in Partur | परतूर शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद

परतूर शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
झारखंड येथे तरबेज अन्सारी यांची मॉब लिचिंगमध्ये समाजकंटकांनी हत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. याबरोबरच उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविरोधात कडक कायद्याची गरज आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पप्पू मंडळ व त्यांच्या साथीदारांना त्वरित अटक करण्यात यावी, मयताच्या पत्नीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, तसेच वारसास एक कोटीची मदत करावी, अल्पसंख्यांकासाठी सुरक्षा म्हणून कायदा करण्यात यावा, दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे, वायलेंस प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट फॉर मायनॉरिटी निर्माण करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधीकारी ब्रिजेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी मुफती अब्दुल कदीर कासमी, मुफती जहीर फारूकी, मोलांना अकील कासमी, अ‍ॅड. महेंद्र वेडेकर, आर.के. खतीब, अखिल काजी, खय्यूमखा पठाण, रहिमोद्दीन कुरेशी, अय्यूब कुरेशी, नासेर चाउस, लयाक कुरेशी, जवेद खान, मोईन कुरेशी, मजहर पटेल, तारेख सिद्दीकी, नंदाताई हिवाळे, बाबूराव हिवाळे, सिध्दार्थ बंड, त्रिशाला सातपुते, गोरेखान कायमखानी, अय्यूब बागवान, शरीफ कुरेशी, जमील कुरेशी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Protest rally in Partur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.