खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून केला निषेध

By दिपक ढोले  | Published: July 23, 2023 04:50 PM2023-07-23T16:50:35+5:302023-07-23T16:51:04+5:30

जालना-निधोना हा १० किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे.

Protests were made by planting Besharam trees in pits | खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून केला निषेध

खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून केला निषेध

googlenewsNext

जालना : जालना तालुक्यातील निधोना-जालना रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह आम आदमी पार्टीच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून रविवारी निषेध केला आहे.

जालना-निधोना हा १० किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघात होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रविवारी बेशरमाची झाडे रस्त्यात लावून घोषणाबाजी केली.

यावेळी, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे, निधोना गावचे उपसरपंच गणेश सोनवणे, बाळू खरात, युवराज डासाळ, शेख अतिक, शेख अन्सर, विजय आदमाने आदींची उपस्थिती होती.

Web Title: Protests were made by planting Besharam trees in pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalanaजालना