अल्पसंख्याकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:50 AM2018-12-19T00:50:39+5:302018-12-19T00:51:17+5:30

ग्रामीण भागातही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असुन, या ठिकाणी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.

Provide facilities for minorities | अल्पसंख्याकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या

अल्पसंख्याकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असुन, या ठिकाणी अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हा धिकारी राजेश जोशी, शहा आलमखान, इक्बाल पाशा, लियाकत अलिखान, अब्दुल रज्जाक बागवान, बाबा कसबे, लेवी निर्मल, पी. डी. लोंढे, शेख अफसर शेख, भास्कर शिंदे, कुरेशी हुरबी अब्दुल मजीद, रुकसाना अहेमद कुरेशी, एजाज तसरीन, फरद्यन फयाजोद्दिन अन्सारी, शेख रियाज शे. गणी, शेख इमाम, रज्जाक बागवान, शब्बीर पटेल, लियाकत अली खान, एकबाल कुरेशी, तय्यब बापू देशमुख, सय्यद जावेद तांबोली, शाह आनम खान मियाखॉन, शेख अफसर शेखजी, शेख इमाम शेख, शेख नियामवबी अयुब, आशा बेगम शेख चॉद, पठाण फेरोजखान हस्तेखान, शेख युनूस लालमियॉ, फय्याज भाई, नसरुलाल खान शफखीलाखान, रुकसाना अहेमद कुरेशी, अबेदा बी शेख महेबूब, शेख फेरोज शेख अजीज, फरान फय्याज अन्सारी, कुरेशी एजाज नसरीन, एस. ओ. बनगे, सु. दि. उचले, एच. आर. वाघले, आर. व्ही. टाक आदींची उपस्थिती होती.
अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती समाजातील प्रत्येकाला व्हावी यासाठी योजनांचे शासन निर्णय प्रत्येकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तसेच समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये संधी मिळावी यासाठी भरतीपूर्व परीक्षेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात यावे. अल्पसंख्याक समाजाचे असलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासाबाबत अनेकविध उपयुक्त अशा सूचनांबरोबरच त्यांच्या असलेल्या अडी-अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर विषद केल्या.

Web Title: Provide facilities for minorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.