प्रांतीय लॉयन्स इंटरनॅशनलची नेतृत्व गुण विकास कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:25+5:302021-01-23T04:31:25+5:30
शंभर क्लबच्या सदस्यांच्या नेतृत्व गुण विकासाची जबाबदारी जयपुरीया यांच्यावर होती. त्या अनुषंगाने २० व २१ जानेवारी रोजी औरंगाबादेत ही ...
शंभर क्लबच्या सदस्यांच्या नेतृत्व गुण विकासाची जबाबदारी जयपुरीया यांच्यावर होती. त्या अनुषंगाने २० व २१ जानेवारी रोजी औरंगाबादेत ही कार्यशाळा घेण्यात आली. यात २१ गावांतील ४५ क्लबच्या १०० सदस्यांनी सहभाग नोंदविला. २० जानेवारी रोजी प्रांतपाल विवेक अभ्यंकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. दुसऱ्या दिवशी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.नवल मालू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेत प्रांतपाल विवेक अभ्यंकर, डॉ.नवल मालू यांच्यासह नांदेडचे दिलीप मोदी, जयेश ठक्कर, नाशिकचे राजेश कोठवडे, नागपूरचे श्रवणकुमार, तसेच सोलापूरचे राजेश कापसे, मुंबईचे राजेश मेहरा, इंदौरच्या रश्मी गुप्ता, राहुल औसेकर, गौरव भरतिया आदी मोटिव्हेशनल स्पीकर आणि फॅकल्टीजनी नेतृत्व गुण कसे विकसित करावे, यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकरणारे कलावंत गजेंद्र चव्हाण, तारक मेहता का उलट चश्मा या मालिकेतील हाथी फेम निर्मल सोनी यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजक लॉ.सुभाषचंद्र देविदान हे होते. यावेळी कमलकिशोर झुनझुनवाला, उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरीया यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.