विकास कामांसाठी २६६ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:43 AM2019-02-28T00:43:57+5:302019-02-28T00:44:41+5:30
जालना पालिकेचा २०१९-२० यावर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प दोन लाख तीन हजार रूपपये शिलकिचा असून, पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये किरकोळ स्वरूपाची वाढ करून उत्पनवाढीवण्यावर भर दिल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.
जालना : जालना पालिकेचा २०१९-२० यावर्षासाठीचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प दोन लाख तीन हजार रूपपये शिलकिचा असून, पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांमध्ये किरकोळ स्वरूपाची वाढ करून उत्पनवाढीवण्यावर भर दिल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनीही महत्वाच्या सूचना मांडल्या.
जालना पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. यावेळी चालू वर्षात मालमत्ता करातून ४२ कोटी ९० लाख रूपये, जालना नगर पालिकेच्या विविध मालमत्तांच्या माध्यमातून भाडे आणि लिझ मधून जवळपास १० कोटी रूपये, पालिकेकडे असलेल्या जमा रकमेवरील व्याजातून दोन कोटी १७ लाख रूपये मिळणे अपेक्षित आहेत. यासह पाणीपुरवठा योजनेची देखभाल आणि दुरूस्ती, स्वच्छता, शिक्षण, घनकचरा प्रकल्प आदींसाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
दरम्यान जालना पालिकेचा अस्थानावरील खर्च हा ५२ कोटी ५७ लाख, प्रशासकीय खर्च १९ कोटी २६ लाख, मालमत्तेची देखभाल दुरूस्तीवर जवळपास ९० लाख रूपये खर्च दर्शविण्यात आला आहे.एकूणच जमा आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यात आला असून, पुढील वर्षासाठी २६६ कोटी १३ लाख रूपयांची तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले.
पालिका : अर्थसंकल्पावर चर्चा
एकूणच अर्थसंकल्पावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. यावेळी महावीर ढक्का, विष्णू पाचफुले, शाह आलमखान, विजय चौधरी, रावसाहेब राऊत यांनी त्यांच्या भागातील प्रश्न मांडले. तसेच ढक्का यांनी मालमत्ता कर वसूलीसाठी ज्यावेळी नाके होते, त्यासाठी धनलक्ष्मी संस्थने ५० लाख रूपयांची ठेव ठेवली होती. ती परस्पर तोडण्यात आल्याचा आरोप केला. शाह आलमखान यांनीही शहरातील मालमत्तांकडे पालिका प्रशासाने लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी पाचफुले यांनी झोपडपट्टीत घरांचे नामांतर करताना पालिकेकडून अडवणूक करून नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सदस्यांचा प्रश्नांना समपर्कक उत्तरे दिली.