‘इन्सानियत’ च्या माध्यमातून जनसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:04 AM2018-04-13T01:04:56+5:302018-04-13T01:04:56+5:30
आॅल इंडिया पयाम ए-इन्सानियत फोरमच्या माध्यमातून देशात जातीय सलोखा राखण्यासह वंचितांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी मौलाना जुनेद फारुखी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आॅल इंडिया पयाम ए-इन्सानियत फोरमच्या माध्यमातून देशात जातीय सलोखा राखण्यासह वंचितांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी मौलाना जुनेद फारुखी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
आॅल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम ही संस्था मराठवाड्यासह राज्यभरात करीत असलेल्या कार्याची माहिती देतांना ते म्हणाले की, यापूर्वीही संस्थेच्या माध्यमातून जालन्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकावर उपाशी फिरणाऱ्यांना अन्नदान करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. जालन्यात अशा प्रकारचा उपक्रम संस्थेने राबविला असून त्यास चांगला प्रतिसाद मिळालेला. अल्पदरात वैद्यकीय सुविधा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करु न देण्यात येत आहे. समाज कोणताही असो. जातीपातीचा कसलाही विचार न करता माणूस म्हणून हे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी सायंकाळी गांधी चमन येथे शिलाई मशीन वितरण कार्यक्र मासाठी संस्थेचे दिल्ली सचिव मौलाना बिलाल अब्दुलहाई हसनी नदवी, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेत अजीम खान, मोईज अन्सारी, मौलाना अब्दुल जब्बार साहब, हाफि ज मुशीर, मौलाना शोएब नदवी, अॅड. नजीब फैसल, सय्यद अन्सार आदी उपस्थित होते.