विकासात्मक कामाला जनतेचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:13+5:302021-01-20T04:31:13+5:30
टेंभुर्णी : केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून टेंभुर्णी व गणेशपूर येथे झालेल्या विकासात्मक ...
टेंभुर्णी : केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून टेंभुर्णी व गणेशपूर येथे झालेल्या विकासात्मक कामांच्या जोरावरच टेंभुर्णी येथे भाजपाची एकहाती सत्ता आली. हा विजय म्हणजे विकासात्मक कामाला जनतेने दिलेला कौल आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य तथा टेंभुर्णी ग्रामरक्षक पॅनलचे प्रमुख शालीकराम म्हस्के यांनी व्यक्त केले.
टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १० जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. याबाबत ते ‘लोकमत’शी ते बोलत होते. टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने जाफराबाद तालुक्यातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आपल्याकडेच राखली आहे. टेंभुर्णीतील मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा न जावू देता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकासाची गंगा आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असेही म्हस्के म्हणाले. यावेळी विजयी उमेदवार लक्ष्मण शिंदे, फैसल चाऊस, मुक्तारखॉ पठाण, शिल्पा देशमुख, मनिषा पाचे, कमल मुळे, चंद्रभागा सोनसाळे, सुमन म्हस्के, सुशीला कुमकर, संगीता अंधारे, माधवराव अंधारे, इंद्रराज जैस्वाल, शंकर भागवत, राजू खोत, गणेश धनवई, ज्ञानेश्वर उखर्डे, शेख मुश्ताक, शिवाजी मुळे, भिकनखॉ पठाण, सर्जेराव कुमकर, संतोष सोनसाळे, रामू मुळे, गौतम म्हस्के, नितीन शिंदे आदींची उपस्थिती होती.